Short introduction about
Param Poojya Paramatmaraj Maharaj
Param Poojya Paramatmaraj Maharaj is a spiritual visionary residing in Adi (Dist. Belgaum) (Karnataka). His message goes beyond the boundaries of castes , sects and religions. His teachings are equally useful for the people residing in all nations. His thoughts are important for all the persons belonging to every culture in the world. There is complete unification of science and spirituality in his thoughts.
The life mission of P. P. Paramatmaraj Maharaj is to awaken the hidden power in every human being. In his book Paramabdhi, he has united all religions under the banner of Universal religion (Vaishvik Dharm). He guides the human beings for the arrival of peace and harmony. Besides Paramabdhi he has written the books like Satposh, Mahonnay, Vartet, Rasyav, Tanwas, Shiprot etc.
(One world, one universal religion)
Short introduction about
Hardayan, Shri Datta Devasthan Matha, Adi
The village Adi is located between Kagal (Dist. Kolhapur) and Nipani (Dist. Belgaum). There is a hill Known as “Sanjivani Giri” in the area of Adi. On the north side and in the middle portion of this hill, Shri Datta Devasthan is located.
On the base ground area near the hill, Sarvejya Sanskritik Bhavan, Valbhalay and some other buildings are constructed. On the auspicious occasion of every Paurnima festival spiritual lecture (Pravachan) is delivered by P.P. Paramatmaraj Maharaj. Food bestowal is done in every Pournima festival and on every Thursday.
In every year, Shri Datta Jayanti festival occurs for nearabout a week period. In that festival, special discourses about Paramabdhi are delivered by P. P. Paramatmaraj Maharaj.
Shri Datta Devasthan, Adi has become a holiest place for the devotees belonging to all castes, sects and religions.
Short Introduction about the book Paramabdhi
The book Paramabdhi has touched the hearts of Hindus, Zoroastrians, Jews, Christians, Muslims and persons relating to other religions also.
The dignitaries relating to various religions state that “Paramabdhi is holiest, purest and greatest book in the world for the welfare of all human beings irrespective of castes, creeds & religions.” Because all castes, creeds & religions are totally safe in the book Paramabdhi. There is no harm to anyone.
By writing the book Paramabdhi Param Poojya Paramatmaraj Maharaj has given the message of divine love. His words are the forms of eternal peace for the world. This strongest book is eternal light for all human beings.
(Readers can read the opinions of dignitaries belonging to various castes, sects and religions. In Bhavik Bhavana Periodicals more than 3500 opinions were published. In this website, only some opinions are included. Rest of the opinions can be read in Bhavik Bhavna Periodicals.)
परमपूज्य परमात्मराज महाराज जी का संदेश
परमपूज्य परमात्मराज महाराज जी ने परमाब्धि, सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव, तन्वास, शिप्रोत आदि ग्रंथों की निर्मिति के द्वारा सभी मनुष्यों के लिए सार्वत्रिक एवं सार्वकालिक ज्ञान प्रदान किया है । उनके द्वारा दर्शाया हुआ सार्वभौमिक मार्ग सभी जातिधर्म संप्रदायों के लोगों के लिए समानरूप से परम उपयुक्त है । उनके सन्देश में विज्ञान और अध्यात्म का परममधुर समन्वय हुआ है । उनका संदेश विश्वशान्ति के लिए बहुतही आवश्यक आवाज है । यह प्रेरणादायक संदेश सभी मनुष्यों के लिए न्याय और एकता का बलवान् संदेश है ।
( विश्वधर्मग्रंथ परमाब्धि के बारे में विविध जातिधर्म संप्रदायों से संलग्न साढे तीन हजार से भी ज्यादा अभिप्रायों का समावेश विविध सालों में प्रकाशित “भाविक भावना” अंकों में किया हुआ है । उनमे से कुछ अभिप्राय इस वेबसाइट में शामिल किये हुए हैं । )
परिचय
परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या
विषयीचा थोडक्यात परिचय
१. आडी येथे निवासाचा आरंभ
परमपूज्य परमात्मराज महाराज यांना अगदी आरंभापासून आध्यात्मिक क्षेत्रातील भाविकांविषयी अत्यंत आत्मीयता आहे.अभियांत्रिकी (Engineering) पदवी प्राप्त केल्यानंतर काही पवित्र क्षेत्री निवासकरून ते दि. १ जुलै १९९१ रोजी आडी (Aadi) येथे आले तेव्हापासून आडी (कर्नाटक राज्यातील बेळगांवी जिल्ह्याच्या निपाणी तालुक्यात) येथील "संजीवनगिरी" नावाच्या डोंगरावर त्यांचे वास्तव्य आहे. या पर्वतावरील श्रीदत्त मंदिर स्थानी त्यांनी ६ ऑक्टोबर १९९५ पर्यंत अनुष्ठान केले आणि त्यांना भगवान् दत्तात्रेयांचा अनुग्रह प्राप्त झाला.
२. वैश्विक धर्मग्रंथ 'परमाब्धिः' ची निर्मिती
प. पू. महाराजांनी "परमाब्धिः" या वैश्विक धर्मग्रंथाची संस्कृत भाषेत विविध छंदांमध्ये रचना केली. त्यांनी स्वतःच या ग्रंथाचे मराठी व हिंदी भाषेतही भाषांतर केले आहे. दि. १२ ऑक्टोबर २००५ रोजी विजयादशमीच्या पावन पर्वावर 'परमाब्धिः' ग्रंथाचे प्रकाशन झाले. या ग्रंथाविषयी प्रायः सर्वजातिधर्मसंप्रदायांमधील संतमहात्मे, विचारवंत, देवस्थाने तसेच राजकारण, शिक्षण, विज्ञान, क्रीडा, अभियांत्रिकी, संगीत, साहित्य, न्याय, उद्योग इत्यादी क्षेत्रांमधील अनेकानेक मान्यवरांनी अत्यंत अनुकूल अभिप्राय व्यक्त केले आहेत.
३. 'भाविक भावना' अंक आणि अनुभव
'परमाब्धिः' ग्रंथाविषयीचे तसेच प. पू. महाराजांविषयी भाविकांना आलेले अनेकानेक अनुभव दहा वर्षे प्रकाशित झालेल्या "भाविक भावना" या अंकांमध्ये अंतर्भूत आहेत. भारतातील विविध राज्यांमधील मान्यवरांप्रमाणेच परदेशातील पुष्कळशा मान्यवरांनीही 'परमाब्धिः' ग्रंथाविषयी आपल्या मधुर भावना 'भाविक भावना' अंकांमध्ये व्यक्त केल्या आहेत.
४. आडीच्या संजीवनगिरिवरील श्रीदत्त मंदिराचा जीर्णोद्धार आणि इतर बांधकाम
प. पू. महाराजांनी येथील प्राचीन दत्त मंदिराचा जीर्णोद्धार केला, जे संजीवन पर्वताच्या मध्यभागी अतिशय शोभून दिसते. मंदिर परिसरामध्ये त्यांनी भाविकांसाठी निवासस्थानांचीही निर्मिती केली आहे. डोंगराच्या पायथ्याशी भव्य सांस्कृतिक भवन आणि त्याहूनही भव्य अशा प्रसादालयाची (भोजन कक्ष) निर्मिती केली आहे. मंदिराकडे जाण्यासाठी सुनियोजित पद्धतीने पायऱ्यांचा मार्ग बनविला आहे.
५. सार्वजनिक उपक्रम आणि प्रवचने
डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या सांस्कृतिक भवनात दर पौर्णिमेला रात्री ७.३० वाजता प. पू. महाराजांचे प्रवचन होत असते. प्रवचनानंतर हजारोंच्या संख्येने आलेल्या भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात श्रीदत्त जयंतीच्या निमित्ताने 'परमाब्धिविचार महोत्सवाचे' आयोजन केले जाते, ज्यात अनेक राज्यांमधील साधुसंत व भाविकभक्त सहभागी होतात. श्रीदत्त जयंती दिवशी लाखोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात येत असते.
६. इतर साहित्य रचना आणि माध्यम प्रसार
प. पू. महाराजांनी "सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव, तन्वास, शिप्रोत" इत्यादी अन्य ग्रंथांची रचनाही केली आहे. त्यांनी लिहिलेले सर्व ग्रंथ सर्वजातिधर्मपंथांच्या सर्व लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. त्यांची मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील प्रवचने 'सद्भाव यूट्यूब चॅनेल' द्वारे प्रसारित करण्यात आलेली आहेत.
विश्वधर्मग्रंथनिर्मिती करणारे प. पू. परमात्मराज महाराज
परमाब्धि ग्रंथाची निर्मिती आणि उद्देश.
जगातील विविध धर्मातील लोकांकडून आपापल्या विशिष्ट शब्दांद्वारे ईश्वरी सत्तेचे राज्य आले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला जातो. ही विविध धर्मीयांची इच्छा एकाच वेळी वैश्विक सर्वधर्मसमन्वयक अशा नूतन सैद्धांतिक विचारांनी पूर्ण करण्याचे कार्य परमात्मराज महाराज यांनी परमाब्धि ग्रंथाव्दारे केले आहे. संपूर्ण विश्वासाठी एकच वैश्विक धर्मग्रंथ परमाब्धितून प.पू. परमात्मराज महाराज यांनी मांडला आहे. जगाच्या कल्याणासाठी ग्रंथाच्या माध्यमातून विश्वधर्माची संस्थापना परमाब्धिकार प.पू. परमात्मराज महाराज यांनी केली आहे. लौकिक विश्वासोबत एक अलौकिक विश्वही आहे जिथे सर्व देवी देवता, ऋषिमुनी, साधू-संत, सिद्ध, योगी व इतरही पवित्र आत्मे आनंदाने विहार करीत असतात. अशा सर्व दिव्यात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीमध्ये सर्व जातिधर्म पंथांमधील भेद संपवून सर्वांचाच उद्धार व्हावा, यासाठी मानव रूपात अवतरित परमाब्धिकार सद्गुरू परमपूज्य परमात्मराज महाराज यांचे सान्निध्य व परममंगलमय विचारांचे आशीर्वाद मिळत आहेत. हे आपले परमभाग्य आहे. सर्व जीवांचे कल्याण व्हावे, सर्वांच्या हृदयात प्रेम, दया, शांती व सौहार्दाची भावना जागृत व्हावी, सर्व जनमनातील भेदरूपी अज्ञान नष्ट व्हावे व सर्वजण एकत्र यावेत या परम उद्देशाने भगवान् दत्तात्रेयांच्या कृपाशीर्वादाने वैश्विक धर्मग्रंथ परमाब्धि सोबत सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव, तन्वास, शिप्रोत इ. सुदिव्य ग्रंथांची निर्मिती करून परमपूज्य परमात्मराज महाराजांनी सर्वच मानव जातीला आशीर्वाद दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे हृदयापासून धन्यवाद…
परमाब्धि ग्रंथाचे महत्त्व आणि अनुभव
परमाब्धि हा वैश्विक धर्मग्रंथ हिंदू मुस्लीम, ख्रिश्चन व इतरही सर्व जातिधर्मपंथांमधील व्यक्तींना आपलासा वाटतो. कारण यामध्ये सर्व जातिधर्मपंथांमधील विचारांचा परमसमन्वय समजून येतो. ज्यामुळे एकमेकांमधील भेदभाव व संघर्ष नष्ट होतात. ज्यांना सर्वधर्म रहस्ये समजून घ्यायची आहेत त्यांनी हजारो ग्रंथ वाचण्यापेक्षा एक परमाब्धि वाचला तरी पुरेसे आहे. असे विविध अनुभव वेगवेगळ्या जातिधर्मपंथांमधील विचारवंतांनी भाविक भावना अंकांमधून व्यक्त केलेले आहेत. दरवर्षी श्रीदत्त जयंती निमित्ताने इथे परमाब्धि प्रसाराच्या निमित्ताने परमाब्धिविचार महोत्सव संपन्न होत असतो. या काळात आडी या तीर्थक्षेत्री वैश्विक धर्मग्रंथ परमाब्धि विषयी अधिक माहिती जाणून घेण्याची संधी मिळत असते. देशभरातील भरपूर साधुसंतांची, राजकीय नेत्यांची, उद्योगपतींची व इतरही मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभत असते. दरवर्षी दत्त जयंतीला सगळा डोंगर व डोंगराच्या पायथ्याशी असलेला सगळा परिसर भाविकभक्तांच्या अफाट गर्दीने फुलून जात असतो. दरवर्षी २० मे या परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या जन्म दिवशी सुध्दा असंख्य भाविक आडीला येत असतात. परमाब्धि या वैश्विक धर्मग्रंथाची चेतना असणाऱ्या जय परेश सर्वायण या वैश्विक मंत्राचा सामूहिक जप करून मिळणाऱ्या चैतन्याचा व सकारात्मक स्पंदनांचा अनुभव आपण नेहमी घेत राहणे आवश्यक आहे. संपूर्ण विश्वाचा परमसमन्वय साधणारा असा हा वैश्विक मंत्र आहे. सर्व देवी देवतांना सर्व सिद्ध, संत, प्रेषित, महात्मे, सत्पुरुष, बुद्ध, जिन, पैगंबर यांना प्रसन्न करणारा व कृपाशीर्वाद मिळवून देणारा असा आहे. ईश्वरी चैतन्याचा साक्षात्कार मिळवून देणारा आहे. आडी येथील विविध सोहळ्यांचा आनंद घेण्यासाठी लौकिक व अलौकिक विश्वातील दिव्यात्मेही उत्साही असतातच असे सर्व भाविकांना वाटते. तसेच सर्व जाती, धर्म, पंथातील श्रद्धाळू भाविकही उत्साही असतातच.
उत्सवांचे स्वरूप आणि महाराजांचे वैश्विक स्थान
प्रत्येक पौर्णिमेच्या प्रवचनातून व श्रीदत्त जयंती निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांमधून नवनवीन विचारांचा कृपाप्रसाद परमपूज्य परमात्मराज – महाराजांच्या कडून आपल्याला मिळत असतोच. प्रत्येकवर्षी कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यासह इतर राज्यातील भाविक तसेच आसपासच्या सर्व शेकडो गांवांमधून याठिकाणी भाविक भक्त उपस्थित राहून या कृपाप्रसादाचा लाभ घेत असतात. प्रत्येक पौर्णिमा उत्सव, २० मेचा जन्मदिनोत्सव व श्री दत्तजयंती काळातील परमाब्धिविचार महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न होत असतो. अगणित भाविक या उत्सवांमध्ये सेवेतून पुण्यप्राप्तीचा लाभ घेण्यासाठी सहभागी होत असतात. परमपूज्य परमात्मराज महाराज हे सर्व मानव जातीला लाभलेले सद्गुरू आहेत, विश्वगुरू आहेत. विविध जातिधर्मपंथांमधील महामंडलेश्वरांनी, महंतांनी, आचार्यांनी व इतरही साधुसंतांनी प. पू परमात्मराज महाराजांना विश्वसद्गुरू, जगद्गुरू, अनंतश्रीविभूषित, मसीहा, विश्ववंद्य इत्यादी उपाधींनी गौरविले आहे. कारण महाराजांचे विचार हे सर्व जातिधर्मपंथांमधील सर्व लोकांच्या शाश्वत कल्याणासाठी आहेत. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, यहुदी, पारशी, जैन, बौद्ध, शीख इत्यादी सर्वधर्मांमधील मोठमोठ्या आचार्यांनी परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या विषयी व परमाब्धि ग्रंथाविषयी अतिशय गौरवपूर्ण उल्लेख केला आहे, हे ‘भाविक भावना’ अंकांवरून जनतेला कळून आले आहेच. परमपूज्य परमात्मराज महाराज विरचित वैश्विक धर्मग्रंथ परमाब्धि सोबतच सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव, तन्वास, शिप्रोत इत्यादी ग्रंथांचा सर्व भाविकांनी लाभ घेणे आवश्यक आहे. या सर्व ग्रंथ वाचनाने व परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या आशीर्वादाने हजारो भाविकांना अतिशय चांगले अनुभव आले आहेत. ते देवस्थानच्या व्हॉटस्अप, फेसबुक इ. समाज माध्यमांवर प्रसारित केलेले आहेत. त्याचाही भाविक भक्तांनी श्रवण करून लाभ घेणे आवश्यक आहे. सद्भाव युट्यूब चॅनेल वरती महाराजांची मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील शेकडो प्रवचने उपलब्ध आहेत. त्याचाही लाभ घेणे आवश्यक आहे.
जगत्कल्याणासाठी अनेक ग्रंथांची रचना करणारे प. पू. परमात्मराज महाराज
सर्व जातिधर्मपथमान्य वैश्विक धर्मग्रंथ परमाब्धिचे निर्माणकर्ते प्रेम, दया, शांती व अभेदरूपी विचारांचा अमृतवर्षाव करणारे ईश्वरीय अवतार म्हणजे श्रीक्षेत्र आडी (ता. निपाणी) येथील दत्त देवस्थान मठाचे सर्वेसर्वा प. पू. परमात्मराज महाराज होय. प.पू. परमात्मराज महाराज यांचे १९९१ सालात दत्तगुरूंच्या पूर्वदृष्टांतानुसार आडी (ता.निपाणी) येथील श्रीदत्त मंदिरात आगमन झाले. प्रारंभी त्यांनी येथे खडतर जपतपादी करून भगवान् दत्तात्रेयांना प्रसन्न करून घेतले. सुमारे ३१ महिन्यांच्या दीर्घकालीन खडतर अनुष्ठानपूर्तीचा महोत्सव असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा झाला. विश्व कल्याणाच्या हेतूने परमाब्धि ग्रंथ लिहिण्यासाठी भगवान् दत्तात्रेयांचा आशीर्वाद लाभला. १२ ऑक्टोबर २००५ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर विश्वकल्याणासाठी प.पू. परमात्मराज महाराजांनी लिहिलेल्या ‘’परमाब्धि’’ ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्यानंतर दत्त जयंतीच्या अनुषंगाने परमाब्धिप्रसार महोत्सव दरवर्षी साजरा होऊ लागला.
कोरोना नंतर दरवर्षी दत्त जयंतीच्या निमित्ताने परमाब्धिविचार महोत्सव साजरा होऊ लागला. यामध्ये दररोज प. पू. परमात्मराज महाराजांच्या अमृतवाणीचा लाभ सर्व भाविकांना होत असतो. विविध उपाधींनी गौरव सद्गुरू परमात्मराज महाराजांना , दत्तावतारी, अलौकिक विचारवंत, विश्वधर्म संस्थापक, जगद्गुरू, विश्वगुरू, अनंतश्रीविभूषित, विश्ववंदनीय आदी उपाधींनी संबोधून मोठमोठ्यांनी गौरविले आहे. परमाब्धी ग्रंथाने फक्त धार्मिक सत्यच नव्हे तर इतिहासातील सत्य, पूर्वकालीन सामाजिक घडामोडीतील सत्य, आधुनिक क्रांतीतील सत्य, प्राचीन काळापासून आजवर झालेल्या असंख्य कोटि ग्रंथांमधील सारभूत सत्य ज्ञान जगासमोर आले आहे. यामुळे विविध भेदांमुळे होणारे कलह संपणार असल्याची आशा बाळगायला हरकत नाही. विनाशाकडे जाणारे कलियुग परमाब्धिमुळे पुन्हा शांतियुगाकडे मार्गक्रमण करेल, असा विश्वास वाटतो.त्यासाठी प्रत्येकाने मनातील पूर्वग्रहदूषित विचार बाजूला सारून प्रथम परमाब्धि स्वीकारायला हवा, वाचायला हवा आणि अंतःकरणात रुजवायला हवा. परमाब्धि ग्रंथाची आवश्यकता का? परमाब्धि ग्रंथाची रचना महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये करून स्वतःच त्यांनी मराठी व हिंदीमध्ये अनुवादित केलेले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य माणसांना परमाब्धि ग्रंथ कळणे अत्यंत अत्यंत सोपे झाले आहे. परमाब्धि ग्रंथाची आवश्यकता का आहे? हे विशद करण्यासाठी चेयान नांवाची एक पुस्तिका परमपूज्य परमात्मराज महाराजांनी लिहिली आहे. परमाब्धि ग्रंथाची सैद्धांतिक भाषा, अनेक व्याख्या, अनेक नवीन दृष्टांत, स्थळ-कालाची, आध्यात्मिक गूढज्ञानाची उकल सहज सोप्या भाषेत समजण्यासाठी महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. त्यामध्ये सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव, सिध्रेण, तन्वास, शिप्रोत हे ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या नांवांमध्येही आध्यात्मिक गूढ अर्थ दडलेला आहे. विविध ग्रंथांचे निर्माणकर्ते – सर्वांना परमाब्धितील सुगूढ विषयांचे आकलन व्हावे यासाठी परमाब्धिपूरक असे सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव, तन्वास, शिप्रोत, सिध्रेण सारख्या सद्ग्रंथांची निर्मिती महाराजांनी केली आहे. या ग्रंथांनी अनेकांना जगण्याचे बळ दिले आहे. या ग्रंथांच्या वाचनाने यापुढेही आपत्तींना सामोरे जाण्याचे बळ नक्कीच मिळत राहील. परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या या सर्व ग्रंथांच्या वाचनाने अनेक भाविकांना आलेले अनुभव, त्यामुळे झालेला त्यांचा आध्यात्मिक, व्यावहारिक जीवनातील लाभ भाविक भावना अंकांमधून तसेच व्हाट्सअप ग्रूपमधून व्यक्त झालेले आहेत. परमाब्धि ग्रंथाचा जगभर प्रसारप्रचार होऊन आध्यात्मिक ज्ञानाचा जगाला उपयोग होऊ दे. महाराजांचे दिव्य सान्निध्य लाभतच राहो, अशी सद्गुरू प.पू. परमात्मराज महाराज यांच्याकडे कृपेची याचना करूया.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण कार्य
प्रकल्पाची ओळख आणि बांधकाम प्रगती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण कार्य हार्दायन, श्रीदत्त देवस्थान मठ, श्रीक्षेत्र आडी मार्फत परमात्मराज अधिष्ठान, वंदूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) या ट्रस्टच्या माध्यमातून वंदूर येथे शंभर बेडचे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल निर्माण कार्य हाती घेतले आहे. येथे भाविकांनी आपल्या परीने आर्थिक स्वरूपात, वस्तूरूपात, श्रमरूपात साहाय्य केले, करीत आहेत. अनेक दानशूर अशा व्यक्ती आर्थिक साहाय्य करीत आहेत. दोन मजली इमारत बांधून गिलावा, प्लंबींग काम झाले आहे. फरशी, दरवाजे, खिडक्या, कलर व इतरही अनेक आवश्यक कामे होणार आहेत. एकूण तीन एकर क्षेत्र असल्याने पार्किंग व इतरही महत्त्वपूर्ण कामांसाठी एवढी जागा पुरेसी आहे. अनेक भाविकांच्या सहयोगातून सुयोग्य वेगाने हे निर्माण कार्य चालू आहे. .
वंदूर (ता. कागल, जि. कोल्हापूर) )
बांधकामाची स्थिती आणि महाराजांवरील विश्वास
शंभर बेडकरिता दोन मजले बांधणे आवश्यक होते. ते आता पूर्णत्वास आले आहेत. विविध मशिनरी, इतर उपकरणे व अनेक आवश्यक बाबींसाठीचा खर्च वेगळा आहे. त्यासाठी भाविकांची साथ मिळत आहे. परमात्मराज महाराजांनी धरलेले प्रत्येक कार्य पूर्णत्वास जात असते, असा भाविकांचा विश्वास आहे. कारण, त्यांचे कार्य म्हणजे सर्वजनहितासाठीचे कार्य आहे. भगवान् दत्तात्रेयांचा आशीर्वाद त्यांच्या प्रत्येक कार्याला असतो. एखादे कार्य महाराजांनी हाती घेतले की भाविकांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण होत असते. हजारो हात त्यांच्या कार्यासाठी राबत असतात. कारण त्यांचे कार्य हे जनतेसाठीच आहे.
उपलब्ध उपचार सुविधा आणि समाजाला होणारा लाभ
इथे ॲलोपॅथीच्या विविध विभागांप्रमाणेच जुनाट आजारांच्या निवारणासाठी होमिओपॅथी व आयुर्वेदिक उपचार विभागही असणार आहेत. त्यामुळे या उपचारांचा लाभ कोल्हापूर, सांगली, बेळगांव, सिंधुदुर्ग आदी अनेक जिल्ह्यांसह इतर भागातील लोकांनाही घेता येऊ शकणार आहे. येथे अगदी योग्य मोबदल्यात सुयोग्य उपचार समाजातील सर्वच गरजवंतांना मिळतील, हा जनतेचा विश्वास आहे. असेच सर्वांचे सहकार्य लाभून आदरणीय गुरुवर्य परमपूज्य परमात्मराज महाराजांचे हे समाजोपयोगी कार्य लवकरात लवकर पूर्णत्वास जाईल असा सर्व भाविक भक्तांचा पूर्ण विश्वास आहे.
देश-विदेशातील मान्यवरांकडून मान्यता मिळविलेला महाग्रंथराज म्हणजे परमाब्धिः
परमाब्धि ग्रंथाची निर्मिती आणि उद्देश.
जगातील विविध धर्मातील लोकांकडून आपापल्या विशिष्ट शब्दांद्वारे ईश्वरी सत्तेचे राज्य आले पाहिजे असा आशावाद व्यक्त केला जातो. ही विविध धर्मीयांची इच्छा एकाच वेळी वैश्विक सर्वधर्मसमन्वयक अशा नूतन सैद्धांतिक विचारांनी पूर्ण करण्याचे कार्य परमात्मराज महाराज यांनी परमाब्धि ग्रंथाव्दारे केले आहे. संपूर्ण विश्वासाठी एकच वैश्विक धर्मग्रंथ परमाब्धितून प.पू. परमात्मराज महाराज यांनी मांडला आहे. जगाच्या कल्याणासाठी ग्रंथाच्या माध्यमातून विश्वधर्माची संस्थापना परमाब्धिकार प.पू. परमात्मराज महाराज यांनी केली आहे. लौकिक विश्वासोबत एक अलौकिक विश्वही आहे जिथे सर्व देवी देवता, ऋषिमुनी, साधू-संत, सिद्ध, योगी व इतरही पवित्र आत्मे आनंदाने विहार करीत असतात. अशा सर्व दिव्यात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पवित्र भूमी आहे. या पवित्र भूमीमध्ये सर्व जातिधर्म पंथांमधील भेद संपवून सर्वांचाच उद्धार व्हावा, यासाठी मानव रूपात अवतरित परमाब्धिकार सद्गुरू परमपूज्य परमात्मराज महाराज यांचे सान्निध्य व परममंगलमय विचारांचे आशीर्वाद मिळत आहेत. हे आपले परमभाग्य आहे. सर्व जीवांचे कल्याण व्हावे, सर्वांच्या हृदयात प्रेम, दया, शांती व सौहार्दाची भावना जागृत व्हावी, सर्व जनमनातील भेदरूपी अज्ञान नष्ट व्हावे व सर्वजण एकत्र यावेत या परम उद्देशाने भगवान् दत्तात्रेयांच्या कृपाशीर्वादाने वैश्विक धर्मग्रंथ परमाब्धि सोबत सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव, तन्वास, शिप्रोत इ. सुदिव्य ग्रंथांची निर्मिती करून परमपूज्य परमात्मराज महाराजांनी सर्वच मानव जातीला आशीर्वाद दिलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे हृदयापासून धन्यवाद…
परमाब्धि ग्रंथाचे महत्त्व आणि अनुभव
परमाब्धि हा वैश्विक धर्मग्रंथ हिंदू मुस्लीम, ख्रिश्चन व इतरही सर्व जातिधर्मपंथांमधील व्यक्तींना आपलासा वाटतो. कारण यामध्ये सर्व जातिधर्मपंथांमधील विचारांचा परमसमन्वय समजून येतो. ज्यामुळे एकमेकांमधील भेदभाव व संघर्ष नष्ट होतात. ज्यांना सर्वधर्म रहस्ये समजून घ्यायची आहेत त्यांनी हजारो ग्रंथ वाचण्यापेक्षा एक परमाब्धि वाचला तरी पुरेसे आहे. असे विविध अनुभव वेगवेगळ्या जातिधर्मपंथांमधील विचारवंतांनी भाविक भावना अंकांमधून व्यक्त केलेले आहेत. दरवर्षी श्रीदत्त जयंती निमित्ताने इथे परमाब्धि प्रसाराच्या निमित्ताने परमाब्धिविचार महोत्सव संपन्न होत असतो. या काळात आडी या तीर्थक्षेत्री वैश्विक धर्मग्रंथ परमाब्धि विषयी अधिक माहिती जाणून घेण्याची संधी मिळत असते. देशभरातील भरपूर साधुसंतांची, राजकीय नेत्यांची, उद्योगपतींची व इतरही मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभत असते. दरवर्षी दत्त जयंतीला सगळा डोंगर व डोंगराच्या पायथ्याशी असलेला सगळा परिसर भाविकभक्तांच्या अफाट गर्दीने फुलून जात असतो. दरवर्षी २० मे या परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या जन्म दिवशी सुध्दा असंख्य भाविक आडीला येत असतात. परमाब्धि या वैश्विक धर्मग्रंथाची चेतना असणाऱ्या जय परेश सर्वायण या वैश्विक मंत्राचा सामूहिक जप करून मिळणाऱ्या चैतन्याचा व सकारात्मक स्पंदनांचा अनुभव आपण नेहमी घेत राहणे आवश्यक आहे. संपूर्ण विश्वाचा परमसमन्वय साधणारा असा हा वैश्विक मंत्र आहे. सर्व देवी देवतांना सर्व सिद्ध, संत, प्रेषित, महात्मे, सत्पुरुष, बुद्ध, जिन, पैगंबर यांना प्रसन्न करणारा व कृपाशीर्वाद मिळवून देणारा असा आहे. ईश्वरी चैतन्याचा साक्षात्कार मिळवून देणारा आहे. आडी येथील विविध सोहळ्यांचा आनंद घेण्यासाठी लौकिक व अलौकिक विश्वातील दिव्यात्मेही उत्साही असतातच असे सर्व भाविकांना वाटते. तसेच सर्व जाती, धर्म, पंथातील श्रद्धाळू भाविकही उत्साही असतातच.
उत्सवांचे स्वरूप आणि महाराजांचे वैश्विक स्थान
प्रत्येक पौर्णिमेच्या प्रवचनातून व श्रीदत्त जयंती निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांमधून नवनवीन विचारांचा कृपाप्रसाद परमपूज्य परमात्मराज – महाराजांच्या कडून आपल्याला मिळत असतोच. प्रत्येकवर्षी कर्नाटक, महाराष्ट्र, गोव्यासह इतर राज्यातील भाविक तसेच आसपासच्या सर्व शेकडो गांवांमधून याठिकाणी भाविक भक्त उपस्थित राहून या कृपाप्रसादाचा लाभ घेत असतात. प्रत्येक पौर्णिमा उत्सव, २० मेचा जन्मदिनोत्सव व श्री दत्तजयंती काळातील परमाब्धिविचार महोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न होत असतो. अगणित भाविक या उत्सवांमध्ये सेवेतून पुण्यप्राप्तीचा लाभ घेण्यासाठी सहभागी होत असतात. परमपूज्य परमात्मराज महाराज हे सर्व मानव जातीला लाभलेले सद्गुरू आहेत, विश्वगुरू आहेत. विविध जातिधर्मपंथांमधील महामंडलेश्वरांनी, महंतांनी, आचार्यांनी व इतरही साधुसंतांनी प. पू परमात्मराज महाराजांना विश्वसद्गुरू, जगद्गुरू, अनंतश्रीविभूषित, मसीहा, विश्ववंद्य इत्यादी उपाधींनी गौरविले आहे. कारण महाराजांचे विचार हे सर्व जातिधर्मपंथांमधील सर्व लोकांच्या शाश्वत कल्याणासाठी आहेत. हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, यहुदी, पारशी, जैन, बौद्ध, शीख इत्यादी सर्वधर्मांमधील मोठमोठ्या आचार्यांनी परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या विषयी व परमाब्धि ग्रंथाविषयी अतिशय गौरवपूर्ण उल्लेख केला आहे, हे ‘भाविक भावना’ अंकांवरून जनतेला कळून आले आहेच. परमपूज्य परमात्मराज महाराज विरचित वैश्विक धर्मग्रंथ परमाब्धि सोबतच सत्पोष, महोन्नय, वर्तेट, रस्याव, तन्वास, शिप्रोत इत्यादी ग्रंथांचा सर्व भाविकांनी लाभ घेणे आवश्यक आहे. या सर्व ग्रंथ वाचनाने व परमपूज्य परमात्मराज महाराज यांच्या आशीर्वादाने हजारो भाविकांना अतिशय चांगले अनुभव आले आहेत. ते देवस्थानच्या व्हॉटस्अप, फेसबुक इ. समाज माध्यमांवर प्रसारित केलेले आहेत. त्याचाही भाविक भक्तांनी श्रवण करून लाभ घेणे आवश्यक आहे. सद्भाव युट्यूब चॅनेल वरती महाराजांची मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील शेकडो प्रवचने उपलब्ध आहेत. त्याचाही लाभ घेणे आवश्यक आहे.
देश-विदेशातील मान्यवरांकडून मान्यता मिळविलेला महाग्रंथराज म्हणजे परमाब्धिः
भाग १: महाग्रंथराज परमाब्धि – निर्मिती, स्वरूप आणि उद्देश
देश-विदेशातील मान्यवरांकडून मान्यता मिळविलेला महाग्रंथराज म्हणजे परमाब्धि:
विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर म्हणजेच १२ ऑक्टोबर २००५ ला परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेला परमाब्धि हा वैश्विक धर्मग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये प.पू. महाराजांनी सर्वकाळ शाश्वत असणारे, सर्वजातिधर्मपंथांद्वारे मान्य झालेले असे ज्ञानामृत दिले आहे. अनेकानेक जातिधर्मसंप्रदायांमधील विविध भेदाचे, कलहाचे, विद्वेष वाढविणारे जे अनिष्ट विचार ते जनमनांमधून दूर करण्याचे कार्य परमाब्धि ग्रंथाद्वारे होत राहणार आहे. या ग्रंथामध्ये वेद, उपनिषदांपासून कुराण, बायबल इ. सर्व ग्रंथांचा सार आहेच. त्यासोबतच नित्यनूतन असे विचारही आहेत.
भाग २: परमाब्धि ग्रंथाला मिळालेले अभिप्राय आणि परमाब्धिकारांचा गौरव
परमाब्धि प्रकाशनानंतर लगेचच या ग्रंथाला अनेक मान्यवरांनी आपले अभिप्राय देण्यास सुरुवात केली. आतापर्यंत जवळपास साडेतीन हजारांहून अधिक अभिप्राय आले आहेत.
राजकीय क्षेत्रातील मान्यवर:
त्यामध्ये राजकीय क्षेत्रातील -माजी प्रधानमंत्री एच्.डी देवेगौडा, माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, पूर्व उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय परिवहनमंत्री व माजी भाजपाध्यक्ष नितीन गडकरी, विद्यमान भाजपाध्यक्ष व केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा, माजी केंद्रीय मंत्री स्व. रामविलास पासवान, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीयगृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री के. रेहमान खान, माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन, कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर इत्यादींनी आपापल्या अभिप्रायांमध्ये परमाब्धीचा अत्यंत अत्यंत गौरव केला आहे.
इतर क्षेत्रांतील मान्यवर:
भारतरत्न भीमसेन जोशी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर व इतरही अनेक शास्त्रज्ञ, अनेकानेक विद्यापीठांचे कुलगुरू, अनेक नामवंत उद्योगपती व साहित्यिक, क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गज इत्यादी मान्यवरांनी परमाब्धी ग्रंथाची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.
माजी मुख्यमंत्री आणि महत्त्वाचे नेते:
माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस् येडीयुरप्पा, कुमारस्वामी, बसवराज बोम्मई, भारताचे माजी संरक्षण मंत्री स्व. मनोहर पर्रीकर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोकराव चव्हाण, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री स्व. शीला दीक्षित, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत तसेच अनेकानेक केंद्रीयमंत्री, विविध राज्यांमधील मंत्री, आमदार, खासदार आदी विविध पक्षांमधील नेते इत्यादी अनेकानेक मान्यवरांनी परमाब्धी हा ग्रंथ सर्वजातिधर्मसंप्रदायांमधील लोकांसाठी उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
धर्माचार्यांचे मत:
वैदिक हिंदू परंपरेतील विविध संप्रदायांमधील आचार्य, महामंडलेश्वर, महंत व इतरही साधुसंतांप्रमाणेच जैन, बौद्ध, शीख परंपरेतील संतमहात्म्यांनी सुद्धा परमाब्धि ग्रंथाचे संपूर्ण विश्वासाठी महत्व प्रतिपादन केले आहे. याशिवाय पार्शी, ख्रिश्चन, मुस्लिम इत्यादी धर्मांमधील मोठमोठ्या धर्माचार्यांनी व त्या धर्माशी संबंधित इतरही विद्वानांनी परमाब्धि ग्रंथाची संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत अत्यंत आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. तसेच परदेशातीलही अनेक संस्कृतभाषातज्ञांनी, अभ्यासकांनी या काळात परमाब्धिचे अतिशय महत्त्व असून याचे विविध भाषांमध्ये भाषांतर होवून जगातील सर्व देशांमध्ये हा ग्रंथ पोहचणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. अनेकानेक देशातील सन्माननीय अशा अनेक विद्वानांनी परमाब्धि ग्रंथाविषयी अत्यंत सुंदर अभिप्राय दिलेले आहेत. परमाब्धि ग्रंथाच्या जागतिक आवश्यकतेचे प्रतिपादन करणारे हे विविध अभिप्राय अनेक वर्षांच्या “भाविक भावना” अंकांमध्ये वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
परमाब्धिकारांचा गौरव:
परमाब्धि या ग्रंथासोबतच परमाब्धिकारांविषयीसुद्धा सर्वांनी गौरवोद्गार काढले आहेत. विविध जातिधर्मपंथामधील साधुसंतांनी, महंतांनी, महामंडलेश्वरांनी, आचार्यांनी, पीठाधीशांनी प.पू. परमात्मराज महाराजांना विश्वसद्गुरू, जगद्गुरू, विश्वधर्मसंस्थापक, अनंतश्रीविभूषित, अनंतविद्याविभूषित, विश्ववंदनीय, विश्वादरणीय, जगद् वंद्य, परमतपोनिधि, अध्यात्मज्ञानविज्ञानभास्कर, मसीहा इत्यादी उपाधींनी गौरविले आहे. कारण महाराजांचे विचार हे सर्वजातिधर्मपंथांमधील सर्व लोकांच्या शाश्वत कल्याणासाठी आहेत.